पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो .से हायस्कूल पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो .से हायस्कूल पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण
संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल .पाचोरा. या ठिकाणी दिनांक 12 ऑगस्ट शुक्रवार रोजी शासकीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली .स्पर्धेत जवळजवळ 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन गटातील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला .या चित्रकला स्पर्धेची सुरुवात करण्यापूर्वी सुबोध कांतायन यांनी स्पर्धेविषयी माहिती सांगितली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रमिलाताई वाघ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पर्यवेक्षक आर एल पाटील . एन आर ठाकरे. उपस्थित होते. चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रमोद पाटील . सुनील भिवसने .सौ ज्योती ठाकरे . आर बी. बोरसे. यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी उत्साहात या स्पर्धेचा आनंद घेतला