श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) उत्सव साजरा

🙏गुरु तुझ विण नाही दुजा आधार🙏 🌈 पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. जयश्री पाटील मॅडम होत्या.प्रथमत: महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुंना वंदन करत त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले. श्रीमती.चारुशीला पाटील मॅडम व मा.अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरूंची महती सविस्तरपणे विशद केली. गुरूंनी केलेल्या उपदेशाचे आपण आपल्या आयुष्यात सदैव आचरण करावे असा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.दीपक पाटील सर यांनी केले.🚩सबसे बडा गुरु गुरूसे बडा गुरू का ध्यास 🚩