अहिल्यानगरचे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांना बढती, राॅकेशजी ओला यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली

अहिल्यानगरचे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांना बढती, राॅकेशजी ओला यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस दलातील जिल्हा पोलिस अधीक्षक राॅकेशजी ओला यांची तडकाफडकी मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सोमनाथ घार्गे हे नविन जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून सेवेत रुजू होणार आहेत.नगर जिल्ह्याच्या पोलिस दलातील चाललेला स्वच्छ कारभार पाहुन ग्रुहमंत्रालयाने पोलिस अधीक्षक राॅकेशजी ओला यांची तडकाफडकी ब्रुहन्मुंबई येथे बदली केली आहे. तेथेही त्यांना ब्रुहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. राज्यसरकार तर्फे हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे नवीन जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून बढती मिळालेले सोमनाथजी घार्गे हे श्रीरामपूर विभागाचे विभागीय पोलिस अधीक्षक (डी वाय एस पी) म्हणून सेवेत कार्यरत होते.त्यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झालेल्या बबलू पंडित यांच्या हत्याकांडाचा तपास स्वतः कडे घेतला होता.राज्य सरकारने घाईघाईने हा अध्यादेश जारी केल्या मुळे घार्गे समर्थक कमालीचे आनंदीत झाले आहेत.जिल्ह्यातील नेत्यांनी शिष्टाई केल्यामुळे हा निर्णय कायद्याला धरुनच घेण्यात आला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाची काळजी पूर्वक जाणिव असलेल्या योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. सोमनाथ घार्गे यांनी पोलिस दलात असताना जिल्ह्यातील अनेक भागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.जिल्ह्यातील चालू घडामोडींचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. म्हणून त्यांना ही बढती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे हे निश्चितच जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया वर लक्ष केंद्रित करून कायदा व सुव्यवस्था ढासळणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून गजाआड करण्यात अग्रेसर राहतील हीच अपेक्षा व्यक्त करूयात. आगामी काळात सोमनाथ घार्गे हे नविन जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी नवनविन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करणे हे त्यांच्या समोरील फार मोठे आव्हान आहे. नवीन जिल्हा पोलिस घार्गे हे गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे अवैधरित्या जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले आहेत. त्यामुळे गावठी कट्टे जवळ बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.