६२वे राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड

६२वे राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड

पाचोरा ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कलासंचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या ६२वे राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील पाचोरा २ विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड झाली. ए. टी. डी. प्रथम वर्षाचा विद्यार्थी सोनवणे प्रथमेश दिलीप याने बुद्धिबळ हा उपविषय घेऊन 2D डिझाईन ह्या विषयावर चित्र रेखा रंगविले व ह्या चित्राची निवड करण्यात आलेली आहे. तसेच ए. टी. डी. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी पाटील पल्लवी नरेंद्र हिने जलरंग या माध्यमात उत्कृष्ट निसर्गचित्रण रंगविले असून या चित्राची देखील निवड करण्यात आलेली आहे. राज्य कला प्रदर्शन ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक बिंबवेवडी पुणे येथे भरविले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातून निवडक कलाकृतींची निवड झालेली आहे.यात पाचोरातील महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांचे चित्रांची निवड झाली ही अभिमानास्पद बाब आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.कुसुम मित्रा मॅडम , सचिव . नरेश मित्रा ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्री. संदीप पाटील , प्रा. निलेश शिंपी,देसले कलाशिक्षक प्रमोद पाटील , सुबोध कांतायन, संदीप परदेशी तसेच पालकांनी कौतुक केले. या निवडीबद्दल ाचोर्‍यातील कलाकारांमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे