परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे यशस्वीरित्या आयोजन

परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे यशस्वीरित्या आयोजन

पाचोरा (प्रतिनिधी
पाचोरा तालुका सहकारी संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आज दि.29 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी परीक्षेतील ताणतणाव कमी करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11:00 वाजता मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम बघण्याची व ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
. इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गात वर्ग शिक्षकांच्या मदतीने युट्युब वर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपक्रमाचा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ ,उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे ,पर्यवेक्षक आर.एल.पाटील,सौ.अंजली गोहील सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनी तणावमुक्त परीक्षा या विषयावर यांच्या कार्यक्रमाचे स्वागत करून आभार मानले.