स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त श्री.गो.से. हायस्कूल येथे महिला मेळावा संपन्न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त श्री.गो.से. हायस्कूल येथे महिला मेळावा संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याप्रसंगी पाचोरा पोलीस स्टेशनच्या P.S.I. श्रीमती विजया वसावे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
मेळाव्यात मार्गदर्शन करतांना त्यांनी मुलींची व महिलांची सुरक्षा, POSCO कायदा, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करणे यासंबंधी माहिती दिली.तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, यासाठी अनमोल मार्गदर्शन केले.याप्रसंगी महिला पालकांशी सुद्धा त्यांनी सुसंवाद साधला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 21 व्या शतकात महिलांच्या योगदानाचे महत्व स्पष्ट केले.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील,श्री. ए. बी.अहिरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी.तडवी,
पो.कॉ.वैशाली मराठे तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.
मेळाव्याप्रसंगी सूत्रसंचलन सौ.एस.टी.पाटील व आभार प्रदर्शन श्रीमती सी. एल.जाधव यांनी केले.