“खासदार उन्मेश दादा बोलताय”का आम्ही जंगलात अडकलो आमची मदत करा

“खासदार उन्मेश दादा बोलताय”का
आम्ही जंगलात अडकलो आमची मदत करा….
——————————————-
पाच तासांचा थरार
आणि
पंधरा तरुणांची सुटका ….
————————————–
गौताळा अभयारण्यात…
रस्ता चुकलेल्या…
चाळीसगांव येथील पाच आणि धुळे येथील दहा भाविकांची…
——————————–
गौताळा अभयारण्य — जळगाव लोकसभेचे युवा खासदार सध्या अधीवेशनानिमित दिल्ली मध्ये आहेत. त्यांना सात वाजता फोन आला. “खासदार उन्मेश दादा बोलताय”..का..
आम्ही जंगलात अडकलो आमची मदत करा….
हो… मी उन्मेश पाटील बोलतो आहे.
काळजी करु नका..
आपण कुठून आला आहात..
कसे अडकला ..
सोबत किती व्यक्ती आहेत.
पाऊस आला तर तुमच्याजवळ काही आहे का…
अशी खासदारांनी चौकशी केल्यानंतर
जंगलात असल्याने पत्ता असण्याचे काही कारण नाही. मग सुरु झाली शोधाशोध….
*पाच तासांचा थरार*
*आणि*
*पंधरा तरुणांची सुटका* ….
सध्या गौताळा अभयारण्यात गर्द झाडीमुळे वन विभागाचे कर्मचारी देखील रस्ता शोधताना जिकरीला येतात अशा अवघड परिस्थितीत
*रस्ता चुकलेल्या*…
चाळीसगांव येथील पाच आणि धुळे येथील दहा तरूणाचा शोध कसा घेणारं मोबाईल असून देखील रेंज मिळत नसल्यानं मोठी पंचाईत अशात खासदार उन्मेश दादांनी मानद वन्य जीव रक्षक राजुभाऊ ठोंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी देसाई आणि पि ए अर्जुन परदेशी यांना सूचना देत कुठल्याही परिस्थितीत या तरुणाची सुटका करावी. असे सांगत गरज पडेल तेव्हा फोन करा. असा आदेशच दिला.
*काय होती परिस्थिती*
धुळे येथील दहा आणि चाळीसगांव येथील पाच अशी पंधरा जण पाटणादेवी दर्शनाला कालीमठ मार्गे आले होते. सायंकाळी उशीर झाल्याने परत पितळखोरे मार्गे परतत असताना जंगलात रस्ता चुकल्याने हरविले होते. अमळनेर नगरपरिषदेचे इंजिनीयर ठाकूर साहेबाचे व धुळे राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी यांचे ते नातेवाईक आहेत. *अमळनेर नगरसेवक पंकज चौधरी यांचे कडून खासदार उन्मेश दादा यांचा फोन नंबर घेऊन नातेवाईकांनी मदत मागितली*. दादा त्यांना शोधावे.. जंगलात त्यांचा मोबाईल नंबर लागत नसल्याने एक दिड तासापासुंन संपर्क होत नाहीं चींतातुर नातेवाईक प्रयत्नशील होते.
सुमारें चार तास फोनाफोनी मध्ये हे सर्व रेंज मध्ये आल्याने अखेर संपर्क झाला..
आम्हीं सर्व गौताळा जंगलात पितळखोरा लेणी परीसरात आहोत. आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत. आम्हाला वाचवा…

*विषारी सर्प,अस्वल, बिबट साक्षात वाघप्रवण क्षेत्रात नेमके अडकले*
राजेश ठोंबरे यांचा संपर्क झाल्याने भयभीत तरुणांनी रडतच आपबिती फोन वर सांगत आम्ही प्रचंड अंधारात आहोत. आम्हाला घ्यायला या..अशी आर्त हाक घातली..
आपण काळजी करु नका. वन परिक्षेत्र अधिकारी देसाई यांच्याशी बोलतो. खासदार उन्मेश दादांचा फोन येऊन गेला..
*विषारी सर्प,अस्वल, बिबट साक्षात वाघप्रवण क्षेत्रात नेमके अडकले आहात* आपण जागचे हालू नका अशी हिम्मत राजू भाऊंनी दिली..
आपल्या जवळ माचीस असेल तर शेकोटी पेटवा त्यांच्या अवतीभवती बसा.. मी माणसे पाठवतो.. शेकोटी मुळे तुमचा लवकर शोध लागेल.
*राजेश ठोंबरे आणि वन परिक्षेत्र अधिकारी (वन्य जीव)ज्ञानेश्र्वर देसाई* यांचे आपसात बोलणे झाले त्या प्रमाणे दोन वन मजुर यांना शोधायला पाठविले. वन विभागाचे कर्मचारी कालीमठ कडून पितळखोरा लेणीकडे निघाले.
*दोन तासाच्या प्रयत्नात*..
वन विभागाचे वनमजूर यांनी एकमेकांचे मोबाइल नंबर देत सुरू झाली शोधाशोध…
अखेर शेकोटी मुळे दोन तासांनंतर कर्मचारी पोहचले या तरुणांच्या जवळ एकमेकांना मिठी मारत देव भेटल्याचा आनंद हरविलेल्या भाविकांनी व्यक्त केला….
*जिवन असो वा*…
*जंगल*
*वाट चुकली तर पडते भारी*…

आज या हरविलेल्या तरुणाच्या आयुष्यात आगळावेगळा अनुभव गाठीशी आला. दैव बलवत्तर नेमका पाऊस नसल्याने मोबाईल फोन ओला होऊन संपर्काचे एकमेव साधन वापरता आले. पाऊस पडला असता तर मोबाईल बंद झाले असते मग रात्र वैऱ्याची ठरली असती..
कर्माने चुक झाली असली तरी दैवाने तारले.. खासदार उन्मेश दादा, पंकज चौधरी, राज्यातील आघाडीचे सर्प तज्ञ राजेश ठोंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी (वन्य जीव) ज्ञानेश्र्वर देसाई साहेब. आणि *जंगलात जाऊन शोधून आणणारे वन कर्मचारी खरे हिरो*
*नागु किसन अगिवले* , *नवशीराम गंगाराम मधे* , *अशोक गंगाराम अगिवले* , *रंगनाथ सोमा अगिवले**या सर्वांचे आभार मानले.
*धुळे* येथील सागर रमेश जगताप
देविदास जयराम केदार
दीपक सुरेश वाघ
रुपेश सुरेश वाघ
प्रशांत युराज पाटील
मयूर किशोर पाटील
कुणाल रमेश लाड
जयवंत विक्रम आहिरराव
कुणाल दीपक शेलार
सागर तोताराम लष्कर
*चाळीसगाव* येथील
राहुल अर्जुन सुर्यवंशी
रोहित पितृश अंडागळे
बाळा प्रकाश सुरवाडकर
निखिल हिरामण निभोरे
उमेश मिलिंद निकम.
या सर्वांच्या जीवनात आज वेगळा अनुभव लिहिला गेला..
शेवटी………l
जिवन असो वा…
जंगल
वाट चुकली तर पडते भारी