गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत यश

गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत यश….!!!!!!

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील खेळाडूंनी जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय १७ तसेच १९ वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात विजयी/उपविजयी होत महाविद्यालयास यश प्राप्त करुन दिले असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे….!!!!

१७ वर्षाआतील (मुले)

जयदीप कैलास सोनवणे (१०० मी.प्रथम)
मिलिंद संजय पाटील (१५०० मी.प्रथम)

१७ वर्षाआतील (मुली)

नंदिनी सुर्यवंशी (३ कि.मी.चालणे)

१९ वर्षाआतील (मुले)

रोहन राजेंद्र राजपूत (लांबउडी,प्रथम व १०० मी.द्वितीय)
गोपाल प्रविण पाटील (१५०० मी.प्रथम)

१९ वर्षाआतील (मुली)

पायल कैलास सोनवणे (१०० मी. व ४०० मी.प्रथम)
भाग्यश्री भगवान पाटील (१५०० मी.प्रथम,८०० मी.द्वितीय)

स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना कार्यवाहक रघुनाथ पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयातील खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.