विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते शिवगौरव सन्मान सोहळा संपन्न

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते शिवगौरव सन्मान सोहळा संपन्न

पाचोरा:- राष्ट्रमाता स्वराज्याचे प्रेरणास्थान मासाहेब जिजाऊ तथा युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शिवचरित्रकार, शाहीर, कीर्तनकार, कवी, मान्यवरांचा सन्मान सोहळा माननीय सौ वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या, पाचोरा भडगाव तथा श्री. अरुण पाटील यांच्या शुभहस्ते दिनांक 12.1.2024 शुक्रवार रोजी सायंकाळी 4:00 वा. शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे अतिशय आनंदात, उत्साहात संपन्न झाला.
सन्मान सोहळ्याप्रसंगी माननीय वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, आपण समाजाची फार मोठी सेवा करीत आहात आपल्या माध्यमाने भगवान श्रीकृष्ण,प्रभू रामचंद्र, पंढरीचा विठुराया यांचा अवतार कार्य तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, न्याय, निती, धर्माचे विचार घराघरापर्यंत व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे अतिशय समाज हिताचे उत्तम कार्य करीत आहात म्हणून राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तथा विश्ववंदनीय स्वामी विवेकानंद महापुरुषांच्या जयंती महाउत्सवाचा निमित्ताने आपला सर्वांचा सन्मान करण्याचे सौभाग्य मला लाभले याचा मला मनापासून आनंद वाटतो.आपल्या हातून अशीच निरंतर समाजसेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते.
यावेळी मा. श्री शिवाजीराव पाटील नगरदेवळा, डॉ.सचिन सर, रवी पाटील, पी. पी. पाटील, संतोष सर, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सचिन देवरे सर, शिवाजीराव पाटील, संतोष पाटील सर, विठ्ठल एकनाथ महाजन, परशुराम सूर्यवंशी, हर्षल पाटील सर, रवी पाटील सर, प्रदीप भाऊ देसले, सुनील पाटील सर, माणिक भारत पाटील, पल्लवी भारत पाटील, संतोष पाटील सर आंबेवडगाव, भिका काशिनाथ भराडी, भाऊसाहेब रुंजू सुर्यवंशी, योगेश पवार, विजय थोरात, तुषार अनिल थोरात, जितेंद्र पांडुरंग भंडारकर, गोकुळ शिवाजी पाटील, नामदेव तुकाराम पाटील, सुरज करण सिंग राऊळ, रामसिंग राजपूत, सुनीताताई पाटील, धनश्रीताई, स्नेहल ताई सामनेर, सुषमाताई राजपूत, वेदराज साहेबराव कपाटे, अशोक हिम्मतराव पाटील, सुनील गणपत पाटील, मधुकर बाबुलाल गडरी, भागवत बापू महाजन, सिताराम शिवाजी महाजन, गोकुळ महस्कर, प्रकाश शंकर जोशी, तुकाराम ओंकार मराठे, पी.पी पाटील सर, समाधान भिका भराडी आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळा प्रसंगी शरद पाटील तालुकाप्रमुख पाचोरा, अनिल सावंत शहरप्रमुख पाचोरा, रवींद्र पोपट पाटील, पप्पू राजपूत, विजय साळुंखे, प्रेमचंद पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, भारत पाटील, संदीप जैन उपजिल्हाधिकारी, राजेंद्र राणा, हरीश देवरे, अभिषेक खंडेलवाल, जी. डी. गांगुर्डे, डीडी नाना संतोष सर, नंदू सर, शुभम राजपूत सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्ताविक आणि संचालन व आभार नाना वाघ यांनी केले.