नशिराबादचे डॉ.भंगाळे देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य लावा

नशिराबादचे डॉ.भंगाळे देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश
आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य लावा

जळगाव प्रतिनिधी : सद्यस्थितीला ऑक्सिजनचा रुग्णांना तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. परिणामी, आता ऑक्सिजनची खरी किंमत प्रत्येकाला कळत आहे. त्यामुळे प्रत्येक आजारी रुग्णाच्या चिठ्ठीवरचं आजारातून बरे झाल्यावर एक झाड अवश्य लावा, म्हणजेचं तुम्हाला व येणा-या तुमच्या पिढीला भविष्यात ऑक्सिजनची कमी पडणार नाही, अशी सूचना देऊन जनजागृतीचे काम नशिराबाद येथील डॉ आशुतोष भंगाळे करीत आहे.

डाॅ.आशुतोष भंगाळे
नशिराबाद जिल्हा जळगाव