OBC समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा.मंत्री गिरीश महाजन यांचे अमोल शिंदे यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले

  1. OBC समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा.मंत्री गिरीश महाजन यांचे अमोल शिंदे यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले

पाचोरा-
काल दिनांक 20 जुलै रोजी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण कायम ठेवण्याच्या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्यासाठी न्यायालयात अभ्यासपूर्ण पद्धतीने भक्कमपणे बाजू मांडत राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षण मिळवून दिले.
मागील काळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितल्याप्रमाणे सत्तेत आल्यानंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याचे आपले वचन पुर्ण केले असल्याने भारतीय जनता पार्टीचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.