Home पाचोरा पाचोरा नगरपरिषद अंतर्गत पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड व शुभेच्छापत्रक भेट

पाचोरा नगरपरिषद अंतर्गत पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड व शुभेच्छापत्रक भेट

पाचोरा नगरपरिषद अंतर्गत पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड व शुभेच्छापत्रक भेट.

पाचोरा ( प्रतिनिधी अनिलआबा येवले )

पाचोरा नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पंतप्रधान आत्मनिर्भर योजना (PMSVANidhi) पथविक्रेतांना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाचोरा शहरातील पथविक्रेते भाजीपाला विक्रेते फ्रुट विक्रेते असे अनेक व्यवसायिकांना नगरपरिषदे अंतर्गत राबवण्यात येणाच्या योजनेच्या माध्यमातून या व्यवसायिकांना तीन टप्प्यात राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देत आहे. या व्यवसायिकांना कोरोना काळात या व्यवसायांवर जी उपासमारीची वेळ आली होती. त्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आत्मनिर्भर योजना या योजनेच्या माध्यमातून यांना एक आधार मिळाला आहे. व आतापर्यंत दुसरा टप्पा या व्यवसायिकांना मिळवून देण्यात आला आहे. व यानंतर पुढील तिसरा टप्पात ५० हजारापर्यंत असेल असे यावेळी पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर मेडम यांनी सांगितले. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात २१७ पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेतला व दुसऱ्या टप्प्यात १५ पथविक्रेत्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. व पुढे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर मॅडम यांनी केले. कार्यक्रमा वेळी सदर योजनेअंतर्गत परिचय बोर्ड व शुभेच्छापत्र यावेळी पथविक्रेत्यांना देण्यात आले या प्रसंगी उपमुख्याधिकारी डी.एस. मराठे, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, शहर प्रकल्प अधिकारी संदीप भोसले, समुदाय संघटक कुणाल तायडे, कृष्णा व्यास, यांच्यासोबत पथविक्रेते व नगरपरिषद कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

Don`t copy text!