कृषि निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

कृषि निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

जळगाव, दिनांक 3 : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषि निविष्ठा खरेदी करताना आवश्यक काळजी घ्यावी, तसेच कृषि केंद्र चालकांनी निकृष्ठ दर्जाच्या खतांची विक्री करू नये, असे आवाहन मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक आणि संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव यांनी संयुक्तपणे केले आहे.
विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहर वाघ आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 26 भरारी पथकांतील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांचेमार्फत कृषि सेवा केंद्राच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी मे. स्वामी नारायण कृषि एजंसी, न्हावी, ता. यावल या खत विक्री केंद्रातुन २२ एप्रिल, २०२३ रोजी थे, केपिआर क्रॉप सायन्स प्रा. लि. आंध्रप्रदेश यांनी उत्पादित केलेले सिंगल सुपर फॉस्फेट खत बॅच क्र. 45/March/2023 व चक्र.C-132/12/2022 चे नमुने तपासणीसाठी घेतले असता खत तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार प्रथम विश्लेषणामध्ये अप्रमाणित झाले आहे. असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
विक्रेत्याकडील उर्वरित साठयास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार विक्री बंद आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी या बॅच नंबरच्या खतांची विक्री करु नये. तसे आढळल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्यात येईल. असा इशाराही श्री. वाघ यांनी दिला आहे.