श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज “बाल आनंद मेळावा”

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज “बाल आनंद मेळावा”

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज “बाल आनंद मेळावा” मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांना वस्तूंचे आदान- प्रदान व व्यवहार ज्ञान प्रात्यक्षिक स्वरूपात उत्तम प्रकारे अवगत व्हावे.या उद्देशाने बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन शालेय समिती चेअरमन बापूसाहेब.जगदीश पंडितराव सोनार यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी शालेय समितीचे जेष्ठ सदस्य अण्णासो. दगाजीराव वाघ,शाळेचे माजी मुख्याध्यापक दादासो. सिताराम पाटील सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर उपस्थित होते. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने विविध खमंग,रुचकर,स्वादिष्ट पदार्थांचे 78 स्टॉल लावले होते. त्यात प्रामुख्याने पाणीपुरी,चटकदार भेळ,खमन,चना- चाट,कचोरी,समोसा,मसालापापड,आरोग्यवर्धक आवळा रस,सोयाबीन चिल्ली, मंचुरियन,खाकरा,इडली-डोसा,लाडू,पोंगे,पॉपकॉर्न,गाजरचा हलवा,आप्पे,मेदूवडा इत्यादी विविध स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल होती. मेळाव्यास संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो.व्ही.टी. जोशी,एम.एम.कॉलेजचे उपप्राचार्य श्री.जी.बी.पाटील सर,कॉलेजचा सर्व कर्मचारीवर्ग, शाळेच्या मुख्य इमारतीतील सर्व शिक्षक वृंद, कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व समस्त पालक वर्गाने मोठ्या संख्येने भेट देऊन सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांच्या खरेदी- विक्रीतून चांगला नफा मिळवत ज्ञान व आनंद या बाल आनंद मेळाव्यातून मिळवला.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.