चाळीसगांव गटविकास अधिकारी यांनी निवेदन स्विकारले तर कर्मचारी यांनी नाकारले

चाळीसगांव गटविकास अधिकारी यांनी निवेदन स्विकारले तर कर्मचारी यांनी नाकारले

चाळीसगांव पंचायत समिती कर्मचारी यांचा अजब कारभार !

सविस्तर वृत्त असे की पाटणा देवी येथिल आदिवासी महिला यांनी ममता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगांव गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले . त्यांनी सदर निवेदन टपालात दया असे सांगितले टपाल घेणाऱ्या कर्मचारी यांनी घरपटटी पाणी पट्टी असेल तर निवेदन घेऊ असे उत्तर दिले !तर असा प्रश्न तयार होतो की गटविकास अधिकारी यांच्या हाताखालील कर्मचारी यांचा अधिकार BDO पेक्षा मोठा आहे काय ?शिवाय तहसिलदार यांच्या टपालात पत्र दिले तर त्यांनी ते पत्र घेतले . मग शासनाचा कायदा काय सांगतो ?पाटणा विकास करणाऱ्या महिला यांनी निवेदन देत होते त्या टपाल कर्मचाऱ्याना कोणाच्या आदेशाने निवेदन घेण्यास नकार दिला ? संविधान ने सर्वाना बोलण्याचा राहण्याचा , लिहीण्याचा अधिकार मागण्याचा अधिकार दिला ! जर प्रशासनाने निवेदन घेण्यास नकार देणाऱ्या अधिकारी यांनी कोणत्या नियमाखाली निवेदन नाकारले प्रशासनाने उत्तर दयावे नाही ! तर अश्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी ?सामान्य लोकांच्या अधिकाऱ्यावर गदा येत असेल तर अश्या अधिकाऱ्यावर शासनाने कार्यवाही केली पाहीजे .