बॉम्बे आर्ट सोसायटी च्या१३२ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात पाचोरा तालुक्यातील शुभम पाटीलच्या छायाचित्राची निवड

बॉम्बे अँड सोसायटी ही संस्था १९८८ मध्ये स्थापन झालेली आहे. या संस्थेचा उद्देश कलाकारांना प्रोत्साहन देणे व त्यांची कला देशात सर्वांपर्यंत पोहोचवणे.असंख्य विद्यार्थी यात सहभाग घेतात .या वर्षीच्या प्रदर्शनात छायाचित्रण विभागात स्टुडन्ट कॅटेगरी मध्ये ८ विद्यार्थ्यांचे फोटो सिलेक्ट झाले . त्यात जे.जे स्कूल ऑफ आर्ट यातून शुभम पाटील याच्या छायाचित्रणाची निवड झाली. शुभम सध्या सर जे. जे स्कूल ऑफ आर्ट (सिरॅमिक विभागात ) अध्ययन करीत आहे.रंगश्री आर्ट फाउंडेशन, पाचोरा या संस्थेचा माजी विदयार्थी आहे. पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील शेतकरी कुटुंबातील देविदास कौतिक पाटील यांचा तो सुपुत्र आहे

सुरुवातीपासून जिद्दी असणारा हा विद्यार्थी आहे. नवनवीन प्रयोग करणारा, कल्पकतेतून वास्तवीकतेशी जुळवणुक असणारी सुंदर शिल्प तो उभारतो . त्यासोबतच छायाचित्रणाचा छंद त्याला जडला. त्याच्या छायाचित्रांतून चित्राचा आशय असा आहे की,दादर चौपाटी जवळ एक नाला दुर्गंधी असलेला,हिरव्या रंगाचा शेवाळ असलेला होता त्याच्या दुर्गंधी पासून लोक दूर जायची परंतु कलाकाराची नजर त्यावर पडली की त्यातून नक्कीच एखादी कलाकृती सापडते किंवा तयार होते. त्या नाल्यात छोटीशी एक लाल पिशवी पडली होती. शुभमची कल्पकदृष्टी त्यावर पडली. आणि त्याला त्यात कलाकृती सापडली.
त्यातील ती लालभडक पिशवी लक्ष वेधत होती आणि नाल्याची दुर्गंधी त्या पिशवीच्या रंगापुढे दुर्लक्षित होत होती. म्हणजेच रंग ही आपल्या जिवनात महत्वाची भुमिका मांडत असते.
माणसाच्या जीवनात अशा अनेक घटना घडतात. वाईट गोष्टी घडतात किंवा अपयश मिळतात परंतु त्यात एखाद्या प्रकाशाचे किरण त्याच्या जीवनाचा रंग बदलतात. ती घटना प्रत्येकाला त्याच्याकडे आकर्षित करते किंवा तो सर्वांचे लक्ष वेधतो हेच त्याला या नाला आणि लाल रंगाची पिशवीत दिसले. आणि ते छायाचित्राच्या माध्यमातून मांडले.
प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते मुंबईच्या जहांगीर आडगाव येथे आपले चित्र लागावे. बॉम्बे आर्ट सोसायटीचे१३२वे भारतीय कला प्रदर्शन हे मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर मध्ये दि.२७फेब्रुवारी ते ०४ मार्च २०२४ येथेसुरू आहे.
प्रदर्शन पाहण्यास प्रचंड कला रसिकांची गर्दी होत आहे.
त्याच्या या यशाबद्दल रंगश्री आर्ट फाउंडेशन, ड्रॉइंग अँन्ड पेंटिंग क्लासेस च्या परिवाराकडून त्याला पुष्पगुच्छ देवून कलेतील जीवनासाठी यशस्वी मनःपुर्वक
शुभेच्छा दिल्यात.