जोगेश्वरी अपंग आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश; गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन

जोगेश्वरी अपंग आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश; गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन

पाचोरा(वार्ताहर) दि,२१
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यताप्राप्त जोगेश्वरी निवासी अपंग आय.टी.आय.,सिल्लोड जि.औरंगाबाद येथे
१७ ते ३५ वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना वेल्डर कम फॅब्रिकेटर व विजतंत्री या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू असून इयत्ता ७ वि पास व त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेल्या अपंग विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले आहे.
——-
संस्थेतील मर्यादीत जागांच्या प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला ,अपंगाचे वैद्यकिय प्रमाणपत्र, गुणपत्रक व ४ पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड आदी कागदपत्र आवश्यक असून प्रवेशाकरिता कोणतेही मुल्य आकारले जात नसून संस्थेमध्ये मोफत वसतिगृह सुविधा, गणवेश व अभ्यासक्रम निहाय मोफत प्रात्यक्षिक साहित्य उपलब्ध असून सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण बोर्डाच्या प्रमाणपत्रमुळे शासकिय व निमशासकिय तथा खाजगी कंपन्यांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले असून अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक९४२३१५५०९३,९५१८३४५३६२ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.