क्रिएटिव्ह स्कूलचे तीन विद्यार्थी ओलिंपियाड एक्झाम मध्ये गोल्ड मेडल घेऊन घवघवीत यश

क्रिएटिव्ह स्कूलचे तीन विद्यार्थी ओलिंपियाड एक्झाम मध्ये गोल्ड मेडल घेऊन घवघवीत यश

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहर) येथील क्रिएटिव इंग्लिश स्कूल येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ओलंपियाड एक्झाम मध्ये वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता त्यापैकी तीन विद्यार्थी यांनी गोल्ड मेडल घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये इयत्ता पहिलीचीं मानसी भूषण सोळुंके, इयत्ता दुसरी मध्ये अनुष्का दीपक पाटील व इयत्ता तिसरी तेजल यशवंत पवार यांना शंभर पैकी शंभर गुण या ऑलम्पिक एक्झाम ला मिळून गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळविले या बरोबरच सहभागी सर्व विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी ओलंपियाड एक्झाम चे जळगाव समन्वयक नारायणजी पवार हें स्वतः हजर राहून सोबत प्राचार्य यशवंत पवार यांनी विजेता विद्यार्थ्यांचा गौरव व अभिनंदन केले. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारी नंतर विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याने स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सहभाग नोंदवता येत नव्हता परंतु त्या परिस्थितीतही क्रिएटिव्ह स्कूलने ऑनलाइन एज्युकेशन सुरू ठेवून या परीक्षेसाठी वीस विद्यार्थ्यांना सहभागी केलेले होते व आपले बुद्धी चातुर्य दाखवण्यासाठी ओलंपियाड परीक्षा चे मार्गदर्शन केले होते. जळगाव जिल्हा ओलंपियाड समन्वयक नारायणजी पवार यांनी आपल्या मनोगत सांगितले की ग्रामीण भागातील क्रिएटिव्ह स्कूल ही पहिली स्कूल आहे ज्यांनी या एक्झाम मध्ये सहभाग नोंदविला व भरघोस तीन गोल्ड मेडल मिळवले यासाठी त्यांनी संस्थेचे स्कूलचे व शिक्षकांचेही कौतुक केले टीचर्स या यशामागे मार्गदर्शन म्हणून प्रा यशवंत पवार,शिक्षिका वृंद अरुंधती राजेंद्र,मनीषा बडगुजर, नम्रता पवार, उज्वला महाले यांनी मेहनत घेतली यशस्वी झालेल्या व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीने प्रा यशवंत पवार व पालक वर्ग यांच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे