Home पाचोरा श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 27 मार्च रोजी महारोजगार मिळावा

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 27 मार्च रोजी महारोजगार मिळावा

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 27 मार्च रोजी महारोजगार मिळावा

पाचोरा:- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल (MCVC)येथे दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता जिल्हास्तरीय महारोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील टीम प्लस एच .आर.सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलाखती घेण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे .अहिल्यानगर, पुणे .छत्रपती संभाजीनगर परिसरातील इलेक्ट्रिकल बस बनवणारी कंपनीसह इतर तीन कंपन्यांचा या रोजगार मेळाव्यात सहभाग असेल .नियुक्त होणाऱ्या विद्यार्थ्यास 17000 ते 19 हजार पर्यंत स्टायपेंड मिळणार असून कॅन्टीन ,बस सुविधा ,इन्शुरन्स सह कंपनीचे लाभ मिळणार आहे.तसेच कमवा व शिका या योजनेअंतर्गत बी .होकेशनल व डी.ओकेशनल डिग्री सुद्धा मिळवता येणार आहे.मुलाखती करिता येताना मार्कशीट,प्रमाणपत्र,शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स,फोटो 3,बँक खाते झेरॉक्स/कॅन्सल चेक झेरॉक्स आवश्यक.

किमान कौशल्य विभागातील कोणत्याही ट्रेडचा पास विद्यार्थी, आयटीआय कोणताही ट्रेड पास विद्यार्थी ,डिप्लोमा ,इंजीनियरिंग वय वर्ष 18 ते 35 असणारा विद्यार्थी या करता पात्र असेल.

महा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पाचोरा भडगाव तालुक्याचे माजी आमदार तथा पीटीसी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब श्री. दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन नानासाहेब श्री.संजय वाघ, संस्थेचे सचिव ॲड.दादासाहेब श्री.महेश एस. देशमुख , संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो श्री.व्हि.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब श्री.खलील देशमुख, शालेय तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब श्री.वासुदेव महाजन ,श्री. बाळकृष्ण मुळे संचालक ,टीम प्लस एच आर प्रायव्हेट सर्व्हिसेस लिमिटेड,प्राचार्य श्री.एन.आर.पाटील सर, उपप्राचार्य श्री.आर .एल.पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .

मुलाखत नोंदणी साठी प्रा.श्री मनीष बाविस्कर सर किमान कौशल्य विभाग प्रमुख 8275270554,श्री शरद माथुरवैश्य सर 7972770106यांच्याशी संपर्क साधावा

Don`t copy text!