नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा तर्फे भडगावात स्वच्छता अभियान उपक्रम संपन्न

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा तर्फे भडगावात स्वच्छता अभियान उपक्रम संपन्न…!!!!!

भडगाव (लोक प्रतिनिधी) – डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा,ता.अलिबाग (रायगड) यांच्या सौजन्याने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १ अॉक्टोबर २०२३ रविवार रोजी भडगाव शहरात विविध परिसरात स्वच्छता अभियान प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांच्या मोठ्या उत्साहाने पार पडले.
सदर अभियानांतर्गत संपूर्ण भडगाव शहरातील गणपती मंदिर,पोलिस वसाहत,दत्त मंदिर,भवानी मंदिर,गिरणा वसाहत,बस स्थानक,बढे कॉंप्लेंक्स,मारुती मंदिर,स्मशानभुमी,भडगाव पेठ,नगरपरिषद,तहसिल कार्यालय आदि परिसरातील जवळपास ७ कि.मी.परिक्षेत्रात श्रीसदस्यांनी मिळून सकाळी ७ ते ११ या वेळेत ओला व सुका कचरा मिळून एकूण ३:०९ टन कचरा जमा करुन त्याची योग्य त्याठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी त्यांना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.