सोयगाव येथे १० जानेवारीला भव्य कबड्डी स्पर्धा आयोजन
दत्तात्रय काटोले
सोयगाव — छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे शनिवार, दि. १० जानेवारी रोजी ६० किलो आतील वजनगटातील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मॅटवर खेळवली जाणार असून इच्छुक संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेत प्रथम बक्षीस २१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ११ हजार रुपये, तृतीय बक्षीस ७ हजार रुपये व चतुर्थ बक्षीस ४ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट चढाईसाठी उदय रावळकर यांच्याकडून १ हजार रुपये तर उत्कृष्ट पकडीसाठी अक्षय औरंगे यांच्याकडून १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ७०० रुपये असून लेट फी ८०० रुपये व तक्रार फी ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था कै. महादु शामराव रोकडे यांच्या स्मरणार्थ प्रा. वामन शामराव रोकडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नोंदणीसाठी सोहिल शिकलगर (मो. ७८४१८०४११६), अविनाश श्रीखंडे (मो. ८४८२८४६८९१), अमर शाह (मो. ९१५६२८२७६९) व जयेश राऊत (मो. ८८८८७३९७०२) पियुष काटोले (मो. 9325659702)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरपाळे यांच्यासह सोपान गव्हांडे, प्रशिक्षक आबा पवार, भरत पगारे, करीम देशमुख, अली पठाण, भगवान रोकडे, कृष्णा जुनघरे, विष्णू खाकरे, दीपक चौधरी, शेख दिलीप, वसंत बनकर, राजेंद्र जावळे, दिलीप पायघन, अविनाश पाटील, विष्णू दुसाने, प्रकाश बोर्डे, आनंदा इंगळे, दत्तु पोटदुखे, ज्ञानेश्वर वाढेकर,दत्तात्रय काटोले, नथ्थु चौधरी, नाना वामने, प्रमोद पाटील, श्रीकांत बोरसे, विजय पगारे, मंगेश सोहनी, सुनील पाटील, अविराज रोकडे, योगेश हजारी, कमलेश काळे, डॉ. सुशील जावळे, डॉ. निलेश गाडेकर, डॉ. निलेश गावडे, डॉ. साईराज तडवी, विश्वेश चौधरी, संजय जावळे, शोभराज चौधरी, विजय गव्हांडे, उदय रावळकर, अक्षय औरंगे आदींसह अनेक क्रीडाप्रेमी विशेष परिश्रम घेत आहेत. सोयगाव, आमखेडा व गलवाडा परिसरातील क्रीडाप्रेमींचे सहकार्य लाभत आहे.
कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार सामने खेळवले जातील. स्पर्धेदरम्यान होणाऱ्या कोणत्याही दुखापतीस अथवा जीवितहानीस आयोजक जबाबदार राहणार नाहीत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एका खेळाडूला एकाच संघातून खेळता येईल. पंचांशी वाद घालणारा संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल. स्पर्धेत फेरबदल करण्याचा अधिकार आयोजक समितीकडे राहील.























