पंढरपूरहुन परत माघारी आलेल्या वै.यादवबाबा दिंडीचे वाघोली पंचक्रोशीत जोरदार स्वागत
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी दींडीरथ घेऊन गेलेल्या अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील वैकुंठवासी सदगुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे वाघोली पंचक्रोशीत जोरदार स्वागत करण्यात आले. पंढरपूरहुन विणा घेऊन येणाऱ्या भाविकांमध्ये वाघोलीचे माजी सरपंच आणि उबाठा शिवसेनेचे नेते बाळासाहेब जमधडे,भिमराज दातीर भाऊसाहेब,जवखेडे दुमाला येथील रामनाथ नेहुल, कासारवाडीचे शिवाजीराव कासार, तिसगाव येथील भरतराव लवांडे या पाच वारकरी भाविकांचा समावेश होता.तिसगाव येथील कोठ विभागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वागत झाले.नंतर प्रदिप राजळे,अण्णा लवांडे, महेश शिंदे, यांनी स्वागत केले.भरतरव लवांडे यांच्या वस्तीवर मुक्काम करण्यात आला.नंतर जवखेडे दुमाला येथील काकडे सर, रामनाथ नेहुल, साहेबराव नेहुल यांनी स्वागत केले.वाघोली शिवारातील भिमराज दातीर नंतर वाघोली विविध सेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग दातीर यांनी रांगोळीच्या सड्यात, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले आणि नंतर सर्व ग्रामस्थांना व विणेकरांना प्रितीभोजन दीले.नंतर दातिर पट्टीतील हनुमान मंदिरासमोर अभंगवाणी झाली.नंतर वसंतराव काळे, दत्तू दातीर,पोपट दातीर, भगवान दातीर, चोपदार रामकिसन चव्हाण,आव्हाड वस्ती, येथे संत पुजन झाल्यानंतर दिलिपराव वांढेकर आणि सुभाषराव वांढेकर यांनी चहापाणी देउन वाट लावले.वाघोली गावातील लक्ष्मीमाता मंदीर, वाघेश्वरी मंदिर, जोडीचे हनुमान मंदिर येथे अभंगवाणी नंतर रुक्मिणी मंदिरातील वैकुंठवासी सदगुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या समाधी स्थळावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केले.व हरीपाठा झाल्या नंतर या दिंडीचे मुख्य सेवेकरी ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसींग यांच्या हस्ते सर्व दींडीतील सहकारी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सामुदायिक आरती होऊन या पायी दिंडी सोहळ्याची सांगता झाली.या दिंडीचे हे ९० वे वर्ष होते.या प्रसंगी ह.भ.प.अभिमंन्यु महाराज भालसींग, बाळासाहेब भालसिंग,मळू बोरूडे, चोपदार रामकिसन चव्हाण,सोसायटीचे संचालक पांडुरंग दातीर,उद्धव नेहुल,शिंगटे सर, शिंदे सर,बाळू उघडे, घनःश्याम नेहुल,आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.