गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय व कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथे गणित दिवस उत्साहात संपन्न

_गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय व कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथे गणित दिवस उत्साहात संपन्न….!!!!!_

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय तथा कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगावच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमीत्त राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले,प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर,वरिष्ठ प्रा.किशोर चौधरी यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.