नवयूवक मराठा समाज बहूउद्देशीय मंडळ तर्फे “ राजर्षी शाहू महाराज चौक ” नामकरण करा अशी मागणी

नवयूवक मराठा समाज बहूउद्देशीय मंडळ तर्फे “ राजर्षी शाहू महाराज चौक ” नामकरण करा अशी मागणी

विषय :- पाचोरा – भडगाव रोड वरील हॉटेल निर्मल रेसिडन्सीच्या पुढील चौकास “राजर्षी शाहू महाराज चौक”

आम्ही खालील सह्या करणार सर्व जण आपणास विनंती करतो की, २०२२ हे वर्ष राजर्षी शाहू महाराज यांचे १०० वे जयंती वर्ष आहे, पाचोरा शहरात कोणत्याही चौकाला किंवा स्मारकाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्यात आलेले नाही. तेव्हा कृपया पाचोरा भडगाव रोड वरील हॉटेल निर्मल रेसिडन्सीच्या पुढील आणि हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडन्सीच्या मागील चौकास राजर्षी शाहू महाराज चौक असे नाव दिल्यास ही बाब पाचोरा नगरपालिका तर्फे राजर्षी शाहू महाराज यांना जयंती वर्षाची आदरांजली ठरेल.

पाचोरा भडगाव रोड वरील हॉटेल निर्मल रेसिडन्सीच्या पुढील चौकास राजर्षी शाहू महाराज चौक म्हणून नाव देण्यात यावे, ह्या चौकापासून दक्षिणेस शाहूनगर- तलाठी कॉलनी, समर्थ व्हॅली व अनेक नवीन कॉलनी कडे जाणारा रस्ता, उत्तरेस राष्ट्रमाता कॉलनी व राजीव गांधी कॉलनी, अनेक नवीन कॉलनी कडे जाणारा रस्ता, पूर्वेस पाचोरा शहरात येण्याचा रस्ता तर पश्चिमेस भडगाव जाण्याचा रस्ता आहे व हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडन्सी आहेत. ह्या चौकातून अनेक कॉलनी मध्ये जाण्याचे रस्ते आहेत अनेक वेळा चौकाला नाव नसल्याने अनेकांना उगाच भटकंती करावी लागते व योग्य कॉलनीत न जाता अनेक लोक इतरत्र जात असतात त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो, या चौकास नाव देण्यात आल्यास जनतेची होणारी फजिती होणे बंद होईल म्हणून सदरच्या चौकास “राजर्षी शाहू महाराज चौक” नाव देण्यात यावे ही आग्रहाची विनंती.
अध्यक्ष श्री. हेमंत ज्ञानदेव चव्हाण उपाध्यक्ष प्रा.श्री. राजेश सुकदेव मांडोळे
सह सचिव श्री. सुनिल नारायण पाटील
सचिव श्री. संजय देवचंद शिंदे.आदी उपस्थित होते