नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कारवाई करून अटक करा : मुस्लीम समाजाची मागणी

नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कारवाई करून अटक करा : मुस्लीम समाजाची मागणी !

पाचोरा प्रतिनिधी =
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्या नूपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आज पाचोरा येथील मुस्लिम समाजाने पाचोरा नायब तहसिलदार संभाजी पाटील व पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरले. यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतांनाअज़हर खान, जय वाघ, रसुल शेख, रफिक बागवान, अय्युब बागवान,अज़हर खान, माजी नगरसेवक बशीर बागवान, मोतीवाले,शकुर बागवान, सत्तार पिंजारी, मुख्तार शाह, मुस्लिम बागवान,अनिस खान सर, रहीम बागवान सर, हारुन बागवान, वसीम बागवान, मोहसीन खान सर, सईद शेख शब्बीर शेख, मुफ्ती इसरार, मौलाना अल्ताफ, हाफिज़ जहुर खान, शाकीर बागवान, रऊफ शाह, मोहम्मद लखारी, निसार पिंजारी, शफीयोद्दीन पिंजारी, मतीन बागवान, आकीब शेख सर, आबीद खान, डॉक्टर झाकीर देशमुख, गफ्फार सैय्यद, आरीॆफ ठेकेदार,अकरम कुरैशी, जावेद कुरैशी,मुजाहीद खाटीक, रउफ टकारी,नाज़ीम हाजी, तारीक सैय्यद, डॉक्टर अकील शेख, आदी मोठय़ा संख्येने मुस्लिम समाज बांधव यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते