पाचोरा ग्रामीण रुग्णालय अखत्यारीत उपकेंद्र त्वरित सुरू करावे अन्यथा ग्राहक संरक्षण परिषदकडे मागणार दाद

पाचोरा ग्रामीण रुग्णालय अखत्यारीत उपकेंद्र त्वरित सुरू करावे अन्यथा ग्राहक संरक्षण परिषद कडे मागणार दाद

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने घेतली गंभीर दखल……
गेली अनेक दिवसांन पासून पाचोरा ग्रामीण ग्रामीण रुग्णालय अखत्यारीत असलेली आरोग्य लसीकरण उपकेंद्रे बंद असून त्या विषयीच्या तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा यांचे कडे आल्याने तालुका अध्यक्ष चींधू मोकल संघटक श्री शरद गीते यांनी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांची भेट घेऊन चर्चा घडवून आणली ,त्यात आरोग्य कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर असण्याचे सांगण्यात आले,आरोग्य सेवा ह्या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने याची गंभीर दखल घेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख हे प्रांत कार्यकारिणी बैठकीस पुणे येथे असल्याने यांचेशी श्री शरद गीते तालुका संघटक यांनी भ्रमणध्वनीवर त्वरित संपर्क करीत त्यांचे कडे तक्रार केली त्यांनी स्थानिक पातळीवर तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य करमाचारी संपावर असल्याने दोन दिवसात पर्यायी व्यवस्था तत्काळ करून सदरची उपकेंद्रे त्वरित सुरू करावीत तसे न झाल्यास ग्राहक संरक्षण परिषद जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे न्याय दाद मागितली जाईल व त्या नंतर याची सर्वस्वी जबाबदारी तालुका आरोग्य विभागाची राहील असे सूचित केले आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका अध्यक्ष श्री चिंधु भाऊ मोकल , तालुका संघटक शरद गीते ,सचिव संजय पाटील ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे हे उपस्थित होते.