सारोळा विकास सोसायटीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

सारोळा विकास सोसायटीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

पाचोरा -(प्रतिनिधी)
तालुक्यातील सारोळा बुद्रुक – वाघुलखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कपबशी चिन्हावर लढलेल्या सहकार पॅनल चा दणदणीत विजय झाला. सारोळा बुद्रुक, वाघुलखेडा व सारोळा खुर्द या तीनही शेतकरी सभासदांची संस्था असलेल्या सारोळा विकास सोसायटीत अत्यंत खिलाडू वृत्तीने झालेल्या या निवडणुकीत मतदार सदस्यांनी शेतकरी पॅनलचा पराभव करीत सहकार पॅनल ला दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सारोळा बुद्रुक विकास सोसायटीत प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच सहकार गटाचे महिला राखीव गटातून जनाबाई पाटील व निर्मलाबाई पाटील आणि अनुसूचित जाती जमाती गटातील हिरामण चंदनशिव हे 03 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र सहकार पॅनल ला विरोध दर्शवत शेतकरी पॅनलने आपले 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने उर्वरित 10 जागांसाठी दिनांक 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

मुकुंदा पाटील, शिवाजी विक्रम पाटील, उत्तम हवाळे-पाटील, ठाणसिंग पाटील, त्र्यंबक पाटील, शंकर पाटील, खुशालराव देशमुख, अनिलराव देशमुख, नाना ज्योतिराम पाटील, बापू मानसिंग पाटील, महारु तायडे पाटील या पॅनल प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सहकार गटाने विजयश्री खेचून आणली. सर्व विजयी उमेदवारांनी अत्यंत साधेपणाने आपला विजयोत्सव साजरा केला.

सारोळा विकास सोसायटीतील नवनिर्वाचित उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे

सर्वसाधारण मतदारसंघ
दिनकर पंढरीनाथ हवाळे (178)
राहुल प्रकाश राव देशमुख (170)
कैलास ठाणसिंग पाटील (164)
गोपाल रामभाऊ पाटील (162)
विलास दयाराम बोरसे (154)
विष्णू मैनाजी पाटील (146)
अशोक शहादु वाणी (141)
शांताराम बाबुराव पाटील (131)

इतर मागास वर्ग मतदार संघ
लक्ष्मण सांडू पाटील (118)

विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ
संदीप रमेश पाटील (128)

महिला राखीव मतदार संघ
जनाबाई सुपडू पाटील (बिनविरोध)
निर्मलाबाई साहेबराव पाटील (बिनविरोध)

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ
हिरामण ओंकार चंदनशिव (बिनविरोध)

एकूण 320 मतदार सभासद संख्या असलेल्या विकास सोसायटी 250 सदस्यांनी मतदान केले त्यापैकी 30 मते बाद ठरली. एम. डी. नेहते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणूक प्रक्रियेत सहकार विभागाचे राहुल बोरसे, अशोक आबा वाणी, प्रकाश दामू बोरसे व ऑडिटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.