पाचोरा येथील मिठाबाई शाळेचा 95 टक्के निकाल
पाचोरा (प्रतिनिधी)
शहरातील एकमेव मुलींची शाळा असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 95 टक्के लागला आहे. मिठाबाई शाळेतून एस.एस.सी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या 63 विद्यार्थिनींपैकी 60 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील राजे पवार, सेक्रेटरी रूपालीताई जाधव व प्राचार्य संजय पवार यांनी यशस्वि विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
गुणाणूक्रमानुसार प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनी खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक – हर्षदा अर्जुन महाजन (89.60%), द्वितीय क्रमांक- नंदिनी बापू वाणी (89%) आणि तृतीय क्रमांक – नियती विकास पाटील (88.20%)