केतकी चितळे व ऍड.नितीन भावे वर कारवाई करावी

केतकी चितळे व ऍड.नितीन भावे वर कारवाई करावी

देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेबांच्या विरोधात अत्यंत घाणेरडे, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी अभंग सदृष्य पोस्ट केतकी चितळे नामक एका विकृत अभिनेत्रीने सोशल मीडियावर केलेली आहे.त्या पोस्ट चा लेखक ऍड.नितीन भावे आहे.

मा.शरद पवार साहेबांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे.या योगदानामुळे भारतभर त्यांना सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान आहे. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरें सारख्या टीकाकारांनी टीकाही केली आहे. मात्र त्यांच्या आजारा बद्दल अत्यंत विकृत स्वरूपाचे लिखाण तुकाराम महाराजांचे नाव घेऊन केले गेलेले आहे. हा फक्त मा. शरद पवार साहेबांचा अपमान नाही तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात ज्या ज्या लोकांनी आपले संबंध आयुष्य घालवले आहे त्यांचा अपमान आहे. त्यामुळे केतकी चितळे हिला व सोशल मीडियामध्ये प्रसारित केलेला अभंग सदृश्य मजकुराचा लेखक ऍड.नितीन भावे याला अटक करून कारवाईची मागणी पाचोरा येथे पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन केली.

माझ्या मते केतकी चितळे ही विकृत झालेली अभिनेत्री असून तिच्या सामाजिक व राजकीय जाणिवा अत्यंत बोथट आहेत. ही विकृती वेळीच रोखली गेली पाहिजे.तरच अश्या घटनांना आळा बसेल.

निवेदन देते प्रसंगी सुचेताताई वाघ (नगरसेविका), ज्योती ताई वाघ (गटप्रमुख) श्रीमती रेखाताई देवरे (तालुकाध्यक्ष), सौ सुनिता देवरे (शहराध्यक्ष),
डॉक्टर. प्रा. सुनीता मांडोळे
यशस्वीनी सामाजिक अभियान तालुकासमन्वयक व तालुका निरिक्षक , जयश्रीताई मिस्त्री, जयश्री ताई हिरे, अनिता ताई देवरे,प्रा.वैशाली बोरकर सामजिक न्याय तालुकाध्यक्ष आशाताई जोगी,सीमाताई साईजान,सरलाताई पाटील,माधुरीताई सिमाजाण, शांतीताई सिमाजाण, सुनैना सिमाजाण, आदी पाचोरा येथील राष्ट्रावादीच्या महिला भगिनी उपस्थित होत्या.