पाचोरा युथ फाऊंडेशन तर्फे श्री.गो.से. हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

पाचोरा युथ फाऊंडेशन तर्फे श्री.गो.से. हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 24 जून रोजी शाळेतील अनाथ विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर यासारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप ‘पाचोरा युथ फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचा मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर यांच्या हस्ते स्वागत व सन्मान करण्यात आला.

… याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ. ए. आर. गोहिल मॅडम, श्री.आर.बी. तडवी सर, सांस्कृतिक उपप्रमुख श्री.आर.बी बोरसे सर, क्रीडा प्रमुख श्री.एस.पी.करंदे सर इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

….. श्री. सुखदेव पाटील, दिलीप संघवी, श्री. पंकज बंथिया,शैलेश बाफना, श्री. अंकित माथुरवैश्य, प्रिया जैन गुप्ता, श्री. ए सी एस, वृषाली शिंपी गवांदे, श्री. कल्पेश सुराणा, श्री. दिवेश बोथरा, श्रीकांत मुथा, अमोल संघवी हे सर्व मान्यवर पाचोरा युथ फाऊंडेशनचे सदस्य आहेत.

….. गरजू विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीबद्दल पाचोरा युथ फाऊंडेशनचे श्री.गो.से. हायस्कूल परिवारातर्फे आभार मानण्यात आले.