पाचोरा येथे 8 व 9 मे रोजी श्री कैला मातेचा महोत्सव

पाचोरा येथे 8 व 9 मे रोजी श्री कैला मातेचा महोत्सव

पाचोरा- येथील श्री कैला माता मंदिर संस्थान, भडगाव रोड येथे सालाबादप्रमाणे श्री महिषासुर मर्दिनी सप्तमी -अष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसीय श्री कैला माता महोत्सवात दिनांक 8 मे 2022 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री कैला माता करोलीवाली देवी च्या भक्तिमय गीतांचे जागरण तर दिनांक 9 मे 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भंडारा -महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

श्री कैला माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा , असे आवाहन श्री कैला माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष जगदीशशेठ माथुरवैश्य, तसेच कार्यवाह पुरुषोत्तम भाईसाहेब अग्रवाल, डॉ. अनुप अग्रवाल, व उत्सव समितीने केलेले आहे.