पिंपळगाव हरेश्वर येथे उद्या दि 7 रोजी जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम व भव्य क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन

पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व सन्माननीय नागरिकांना आवाहन करण्यात येते कि …

मा.डॉ श्री प्रविण मुंढे साहेब (IPS) पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या संकल्पनेतून

पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशन येथे उद्या दिनांक ७/५/२०२२ रोजी सकाळी ०८ वाजे पासून रात्री ०६ वाजे पर्यंत …

” जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे “.

तरी पिंपळगाव हरे. तसेच पो.स्टे हद्दीतील इतर गावांतील सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटना ,धार्मिक संस्थेचे पुजारी, ट्रस्टी , मौलाना , रोटरी क्लब , जॉगिंग ग्रुप , सायकलिंग ग्रुप , शैक्षणिक संस्था , शिक्षक वग॔ , विद्यार्थी , धार्मिक संघटना , शांतता समिती , पोलीस पाटील , वैद्यकीय संघटना , मेडीकल असोसिएशन , शासकीय कार्यालय , पोलीस मित्र , ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य , पत्रकार बंधू , महिला संघटना व सर्व जाती धर्माचे नागरिक , महिला व मुले , सराफा , व्यापारी असोसिएशन , रेडिमेड व कपडा असोसिएशन , प्रिंटींग असोसिएशन सर्व व्यापारी सदस्य व सव॔ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील संबधितांना विनंती करण्यात येते कि जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहीमेत सहभाग घेऊन आपले शहर हे शांतता प्रिय व जातीय सलोखा असलेले शहर आहे हा संदेश द्यावा हि विनंती .

विनीत
श्री महेन्द्र वाघमारे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
पिंपळगाव हरे. पो स्टे