कर्जाने येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप

कर्जाने येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातर्फ़े आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा’ आज समारोप समारंभ पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य श्री. गोविंदा बापू महाजन,
चोपडा नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष सौ सुरेखाताई मोतीराम माळी,
चोपडा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. शोभाताई अशोक पाटील, माजी नगरसेविका सौ. रोहिणीताई सुनिल पाटील, आदिवासी प्रकल्प समिती सदस्य तथा मेलानेचे माजी सरपंच श्री. प्रताप खाज्या बारेला, उपप्राचार्य प्रा. डॉ ए. एल. चौधरी,कर्जाने येथील उपसरपंच श्री. प्रमोद भाया बारेला, कर्जाने येथील पोलीस पाटील श्री. सुनील चंद्रसिंग बारेलाआदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, कै.मा.ना.अक्कासो. सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात झाली.
या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख अधिकारी डॉ. पी. के. लभाने यांनी केले. यावेळी त्यांनी शिबिरादरम्यान केलेल्या कार्याचा आलेख सादर केला. त्यात वनराई बंधाऱ्याची निर्मिती, गावातील परिसराची केलेली साफसफाई,विविध जनजागृती पर केलेले पथनाट्य,कोविड लसीकरणा संदर्भात केलेले सर्व्हेक्षण यांचा समावेश होता.
याप्रसंगी किर्ती पाटील, रोशनी राणे, तृप्ती बारी या स्वयंसेवकांनी संपूर्ण हिवाळी शिबिराचा आलेला अनुभव कथन केला.
‘नॉट मी बट यु’ या संकल्पनेनुसार स्वयंसेवक हिवाळी शिबिरात विविध उपक्रमात सहभाग घेत होते. या उपक्रमातून उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून शार्दुल भुवनेश्वरी सतीश व गणेश कोळी या स्वयंसेवकांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री. गोविंदा बापू महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्वयंसेवकांना समाजसेवा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्रमोद भाया बारेला व सुनील चंद्रसिंग बारेला यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.
समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ॲड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांनी ‘आयुष्यात आवश्यक असणारे नॉलेज कसं वाढवावं, त्यासाठी काय करता येईल,सोशल मीडियाचा वापर कसा करावा, लायब्ररीचा वापर किती करावा, कोणती पुस्तकं वाचावी, आपला वेळ कुठे घालवावा या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले व समाजातील उच्च पदावर पोहोचलेल्या अनेक व्यक्तींचे उदाहरण स्वयंसेवकांना देऊन भावी वाटचालीसाठी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ. एस. बी. पाटील यांनी केले तर
आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.एन. सौदागर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. बी. एच. देवरे, सौ.पी.के. गायकवाड व श्री. रवी मांडोळे यांनी परिश्रम घेतले.