चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे आयोजित “भौतिकशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धा ” उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी उपस्थित होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी,उपप्राचार्य एन.एस.कोल्हे तसेच भौतिकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, डॉ. व्ही.आर. हूसे, गोपाल वाघ, निरंजन पाटील, जितेन धोबी, प्राजक्ता वानखेडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.प्रिती रावतोळे यांनी केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. ए.एल.चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रश्नमंजुषेमध्ये २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कु.सिद्धी महेश नेवे, द्वितीय पारितोषिक शरद कैलास कोळी,तृतीय पारितोषिक कू.विद्या सुनील महाजन व दिशा प्रदीप चौधरी तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक कू.अस्मिता उखर्डू सोनवणे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पाटील यांनी केले तर आभार डॉ. व्ही.आर. हुसे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश भाट ,जितेंद्र कोळी,विशाल पाटील यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.