पाचोऱ्याचा चहा विक्रेता झाला मुंबईचा फौजदार

पाचोऱ्याचा चहा विक्रेता झाला मुंबईचा फौजदार

पहिल्याच दिवशी केला मोठ्या भावाचा सन्मान, प्रथम खुर्चीवर बसन्याचा शिवडी पोलीस स्टेशनात दिला बहूमान

पहिल्याच दिवशी मुंबई येथे शिवडी पोलीस स्टेशनात रूजू होताना पीएसआय श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेबानी केला मोठ्या भावाचा सन्मान प्रथंम खुर्चीवर बसन्याचा दिला बहूमान, साहेबांच्या एक अशिक्षित परिवाराची गरीब कुटुंबाची अजब कहानी अशी आहे.
खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावाचे बाहेरपुरा भागातील मुळ रहिवाशी असुन काळ्या मातीत राबराब राबून सुर्य नारायणाच्या साक्षीने तापत्या उन्हात दररोज घाम गाळून सालदारी मजुरी करणारे आईवडील.वडील कै.एकनाथ दौलत महाजन आई गं.भा.रूख्माबाई एकनाथ महाजन ह्या पेरकर परिवाराची अंधकारमय जिवनातील मोठ्या संकटांना तोंड देवून ही संघर्षमय गाथा पुढे अशी आहे परिवारातील पुर्णपणे सर्व लोक एकदम अशिक्षित होते त्यांना कुठलेही शिक्षणाचे ज्ञान नव्हते. त्यांना पोस्ट कार्ड सुद्धा वाचण्यासाठी दुसऱ्या वेक्तींन कडुन वाचुन घ्यावे लागत असे अठराविश्व दारीद्रयतून पुढे आलेला असा हा परिवार आहे.भगवंताच्या कृपाशीर्वादाने आईवडीलांच्या पुण्याईने मोठा मुलगा माऊली विठ्ठल एकनाथ महाजन शाहीर हे सन.1978 मध्ये त्यांनी शाळा सोडली.व परिवाराची हलाकिची परिस्थितीअसल्यामुळे त्यांना अल्प शिक्षणा वरती थांबुन समाधान मानावे लागले.आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे श्रीसंत सावता महाराज टी स्टॉल सुरू करून मोठ्या भावाने परिवार पुढे घेऊन जाण्यासाठी लाहान भावाला शैक्षणिक पाठबळ देण्याचे ठरवले आणि मोठा भाऊ शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन व भाजीपाला विक्रेती मोठी बहीण अंजनाताई या दोघे भाऊ बहीणीने मोठं स्वप्न पाहुन लाहान भाऊला श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेबांना चांगलं उच्च शिक्षण देण्याचे ठरविले. आणि अधिकारी बनवण्याचे मोठं स्वप्न बघितले लहान भावला सोबत घेऊन सर्व जाती धर्माचे बहुजन समाजातील शिक्षक अधिकारी कर्मचारी मंडळींना भेटुन त्यांचे मार्गदर्शन घेऊन लहान भावाला शैक्षणिक मोठं पाठबळ देवून एक लहान व्यवसायातून चहाचा स्टॉल वरती व्यवसाय करून आईवडील दोन भाऊ चार बहिणी येवढा घरातील परिवार सांभाळून,लहान भावाला बी.एस्सी.अॅग्रीचे शिक्षण वाय.सी.एम.विद्यापीठ नाशिक येथे डीग्री घेऊन आणि महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाच्या एम.पी.एस्सी.स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन एक चहाचा व्यवसाय करणारा मोठा भाऊ एक भाजीपाला व्यवसाय करणारी मोठी बहीणीने भावाला केला मुंबईचा फौजदार..
आईवडिलांच्या नावाचा झाला उध्दार, माऊली विठ्ठल भाऊनी भावाला मुंबईचा फौजदार केला. म्हणून मोठ्या भावाचा केला सन्मान प्रथंम खुर्चीवर बसन्याचा दिला बहुमान, बघा एक लेखणी मुळे झाला मुंबईचा फौजदार, भाऊबहीणीचे स्वप्न भगवंताने केले साकार,
मुंबईचा फौजदार,श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब शिवडी पोलीस स्टेशन मुंबई महाराष्ट्र,