गुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय

गुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय

पाचोरा (प्रतिनिधी)
पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली असून यात शेतकरी पॅनल आणि नम्रता पॅनल यांच्या सरळ लढत होऊन नम्रता पॅनल चे सर्व उमेदवार निवडून आले, यात अनुसूचित जाती जमातीचे विजय शांताराम सावळे हे नम्रता पॅनल चे बिनविरोध निवडून आले,
सर्वसाधारण कर्जदार सभासदांमधून नम्रता पॅनल चे सर्व ८ उमेदवार निवडून आले त्यात राजधर माधव मालकर (६५०), राजेंद्र शंकर गीते (६४७), जयप्रकाश रतीलाल जैन (६३१), शालिग्राम ओंकार मालकर (६२७), खाटीक अनिस हाजी भैय्या (६०७), नाईक विजयसिंह धर्मा (५८७), चव्हाण ज्योतीलाल मोहनदास(५९०), बडगुजर बालू तुळशीराम (५७२) तर शेतकरी पॅनेलचे पराभूत उमेदवार बडगुजर गंगाधर श्रावण (२०४), मुसलमान शेख रफिक शेख उस्मान (१८३), कुटे संतोष सीताराम (१८२), परमाणे विठ्ठल रामा (१७९), बडगुजर रवींद्र माधव (१६१), इतरमागास वर्गात नम्रता पॅनल चे सुनील संपत क्षीरसागर (६२१) विजयी तर शेतकरी पॅनल चे किशोर भिकणराव गरुड (१७५), महिला राखीव मधून नम्रता पॅनल च्या श्रीमती जयश्री सुनील बडगुजर (६४५), सौ भीमाबाई तोताराम पाटील (६२८), तर शेतकरी पॅनल च्या पराभूत सौ इंदूबाई हिम्मत पाटील (१९२), भटक्या विमुक्त जाती मधून नम्रता पॅनल चे विजयी उमेदवार सुरेश दत्तात्रय भडांगे (६२५), शेतकरी पॅनल चे पराभूत उमेदवार किशोर भगवान भोई (१७२)
नम्रता पॅनलचे पॅनल प्रमुख सुखदेव गीते सर, शालिग्राम मालकर, राजुदादा क्षीरसागर, विठ्ठल नारायण गीते, वसंत गीते, विठ्ठल रामदास गीते, रवी जाधव, रवी गीते, राजू माळी, प्रशांत माळी, मौजूलाल जैन, दिलीप जैन, मिलिंद देव, देवेंद्र देव, सुरेश बडगुजर, किरण बडगुजर, राजधर मेटे, बी डी पाटील सर, गोरख पाटील, शिवदास भुरा राठोड, शिवदास ताराचंद राठोड, डॉ नितीन चव्हाण, बंटी राठोड, अमोल राठोड, योगेश हटकर, धनराज मदने, गुलाम बागवान (गुल्लू शेठ), खुर्शीद मिस्तरी, सुभाष सावळे यांचेसह अनेक मान्यवर होते.
विजयी सर्व उमेदवारांचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे