पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व शिंदाड ग्रामपंचायत, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान शिबिर संपन्न

पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामपंचायत, शिंदाड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे रोगनिदान शिबिर आयोजित केले गेले

या कार्यक्रमाला त्या परिसरातील नागरिकांनी लाभ घेऊन सहकार्य केले. हा कार्यक्रम राम मंदिर, शिंदाड येथे सकाळी आठ ते दोन पर्यंत करण्यात आला. यावेळी दादासो डॉ.स्वप्निल प्रल्हादराव पाटील व डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांनी भव्य अश्या रोग निदान शिबिरात नागरिकांची तपासणी करून औषधोपचार केला. यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, शिंदाड सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र विक्रम पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ, धना आपा, विलास पाटील, डॉ. एस. आर.पाटील, डॉ. एल. टी. पाटील, डॉ. दीपक चौधरी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. राजेंद्र परदेशी , शाळा समिती अध्यक्ष संदीप बोरसे, कैलास दादा, बाळू श्रावने, सतिष बोरसे व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या. परिसरातील नागरिकांसाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या ह्या भव्य अश्या आरोग्य शिबिरा बद्दल ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी डॉक्टर स्वप्निल पाटील दादा यांचे आभार मानले.