महात्मा ज्योतीबा फुले शिक्षक परिषदेतर्फे खडकदेवळा येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य

महात्मा ज्योतीबा फुले शिक्षक परिषदेतर्फे खडकदेवळा येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य

पाचोरा…
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद जळगाव तर्फे दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने माध्यमिक विद्यालय खडकदेवळा तालुका पाचोरा येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

खडकदेवळा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा झाला. मेजर ध्यानचंद व विश्वासराव पवार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै. सरदार कृष्णराव पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मंचावर महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, सहसचिव चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, पाचोरा येथील क्रीडा शिक्षिका उज्वला देशमुख -महाजन, विश्वासराव पवार ट्रस्टचे विश्वस्त प्रमोदराव गरुड, पत्रकार आत्माराम गायकवाड, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कुंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने खडकदेवळा हायस्कूलच्या पर्यवेक्षिका कुंदा पाटील- शिंदे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, क्रिकेट, स्किपिंग रोप, लगोरी, बुद्धिबळ, सिलिकॉन रिंग, एअर फ्लायर डिस्क, वगैरे इनडोवर आणि आउटडोर क्रीडा साहित्य भेट दिले.

यावेळी प्रमोदराव गरुड, सुरेखा सोनवणे मॅडम,शिवाजी शिंदे, उज्वला देशमुख मॅडम यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. एस. वाय. दिसले यांनी सूत्रसंचालन केले, वाय. बी. परदेशी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख स्वप्नील बागुल, ए.टी. घोडेस्वार, निवृत्ती बाविस्कर, शरद साळुंखे, श्रीमती परदेशी मॅडम, सुनील गुजर, सागर परदेशी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.