चोपडा महाविद्यालयातील ०८ विद्यार्थ्यांचे ‘अविष्कार स्पर्धेत’ यश

चोपडा महाविद्यालयातील ०८ विद्यार्थ्यांचे ‘अविष्कार स्पर्धेत’ यश

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डाॅ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे ‘अविष्कार-२०२३’ अंतर्गत दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी चाळीसगांव येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत’ घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील संदिप भदाणे व यश महाजन, इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रतिक सैंदाणे व रितेश पाटील, प्राणीशास्त्र विभागातील वैष्णवी पाटील व सदाफ बागवान, इंग्रजी विभागातील भैरवी माळी व सारिका माळी अशा एकूण ८ स्पर्धेकांची विद्यापीठस्तरावर निवड झाली. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील डाॅ. व्ही.पी. हौसे, डाॅ. डी.एस.पाटील, डाॅ. एच.जी.सदाफुले, डाॅ. पी.एन सौदागर, डाॅ. सी.आर.देवरे व एम. ए. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदिप सुरेश पाटील, सचिव डाॅ.स्मिताताई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी.ए.सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डाॅ. के.एन. सोनवणे, अविष्कार स्पर्धेचे समन्वयक डाॅ. के.डी. गायकवाड आदि उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.