अजित पवार यांना मोठा धक्का, शिखरबॅंक महाघोटाळा उघडला, जिल्ह्यातील नेत्यांचे धाबे दणाणले ?

अजित पवार यांना मोठा धक्का, शिखरबॅंक महाघोटाळा उघडला, जिल्ह्यातील नेत्यांचे धाबे दणाणले ?

(सुनिल नजन “चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) देशांचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी साहेब यांनी भोपाळच्या जाहीर सभेत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाला पाठींबा देऊन सरकार मध्ये प्रवेश मिळवत सिंचन घोटाळा दडपला होता. परंतु आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर आरोप असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणातील फाईल उघडण्यात आली आहे.या (२५,०००) कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने विषेश न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.विषेश सरकारी वकील अँव्होकेट राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे “सीफ”समरी अहवाल सादर केला आहे.त्याची पुढील सुनावणी न्यायालयाने १५ मार्च या दिवशी ठेवली आहे.पोलीसांनी दाखल केलेला “सीफ समरी”रिपोर्ट अहवाल स्वीकारायचा की नाकारून पोलीसांना या प्रकरणात आरोप पत्र सादर करण्याचे निर्देश द्यायचे या बाबतीत मात्र आता विषेश न्यायालय हे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “सीफ समरी म्हणजे काय “? जर एखाद्या प्रकरणात चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातो किंवा तो गुन्हा दिवाणी स्वरूपाचा असतो तेव्हा पोलीस “सीफ समरी” रिपोर्ट अहवाल सादर करतात. शिखरबॅंक महाघोटाळा प्रकरणी २०जानेवारी रोजी पोलीसांनी लोजर रिपोर्ट “फ”दाखल केला होता.नव्याने तपास करून काही पुरावे हाती लागले नाहीत असे पोलिसांनी म्हटले होते.सप्टेंबर २०२० मध्ये पोलीसांनी दाखल केलेला लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्विकारला होता.परंतू आॅक्टोबर २०२२ मध्ये ई ओ डब्लू ने नव्याने तपास करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली होती. अहमदनगर जिल्ह्यातील एक बडा नेता या शिखरबॅंक महाघोटाळा प्रकरणात गुंतलेला आहे.आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी च्या स्पर्धेत सहभागी असलेल्या या नेत्याचे मात्र धाबे दणाणले आहेत.त्यामुळे आपल्या सौभाग्यवतीला किंवा पुतण्याला पुढे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा घोटाळा बाहेर काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना “भोकाडी” दाखवून गप्प बसवण्याचे भाजपाचे तंत्रज्ञान असल्याचे बोलले जाते.राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाने खासदारकी आणि आमदारकीच्या जास्त जागेवर हक्क सांगता गप्प बसावे म्हणून भाजपच्याच नेत्यांची ही नवी खेळी असल्याची आतील गोटात चर्चा सुरू आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांची” चुप बैठ नहीं तो कान काटुंगा”अशी स्थिती निर्माण होउन”ईकडे आड आणि तिकडे विहीर”अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बिचारी मुकी कुणीही हाका अशी गरीब प्राण्यांप्रमाणे काही नेत्यांची अवस्था झाली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बुलंद आवाज म्हणून घेणारे नेते आता मात्र भाजपच्या नेत्यांपुढे सपशेल शरणागती पत्करून गुमान वाटचाल करीत स्वतः ला धंन्य म्हणून घेत भाजप नेत्यांच्या हातात हात घालून काम करीत आहेत.राष्ट्रवादीने एखाद्या प्रकरणात जास्त प्रमाणात ताणून धरले की मग घोटाळे उघडकीस आलेच म्हणून समजा असे चित्र आता निर्माण झाले आहे.महाराष्ट्राच्या ढाण्या वाघाला आता भाजपने दावणीला बांधून शेळी केल्याचे दिसून येत आहे.शिखरबॅंक महाघोटाळ्याने डोके वर काढल्याने आरोपपत्र दाखल असलेल्या संबंधित नेत्यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर झोप उडाली आहे.न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून काही नेते पाण्यात देव बुडवून निकालाची वाट पहात बसले आहेत. महाराष्ट्रात आता या घोटाळ्यात ईडीच्या जाळ्यात अडकण्याचा कोणा कोणाचा नंबर लागतो याकडे संपुर्ण महाराष्ट्रा चे लक्ष लागले आहे.शेवटी न्यायालयाच्या आदेशानुसारच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.