नाँद्रा येथे सततधार पाऊसामुळे पुन्हा मातीचे राहते घरे कोसळले

नाँद्रा येथे सततधार पाऊसामुळे पुन्हा मातीचे राहते घरे कोसळले

नाँद्रा ता.पाचोरा(वार्ताहार) येथे गेल्या आठ दिवसापासून सततधार पाऊस चालूच आहे व आता जळगाव जिल्हा अतिवृष्टी घोषीत करून रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे त्याच अनुशँगाने दि.२७ सप्टेंबर च्या मध्यरात्री पासून पावासाचा जोर नाँद्रा सह परिसरात सुमारे १०० एम.एम.च्या सरीने कोसळत असल्याने मातीचे घरे काय? पण सॕलपच्या घरानाही खाली बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे अशातच नाँद्रा येथील कोबँडापुरीतील रहिवासी इंदूबाई तुकाराम बाविस्कर आपल्या दोन नातवाह सह त्या घरात राहत होत्या .घर ही तसे मातीचे होते पण अचानक घर कोसळेल असे वाटत नव्हते पण सुदैवाने इंदूबाई ह्रा दि.२७ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीकडे आव्हाणीला गेल्या होत्या व दोघे नातू ही गावातच राहणाऱ्या आपल्या वडीलाकडे गेल्यामुळे पुढिल अनर्थ टळला.माञ इंदूबाई यांनी उभारलेल्या कष्टापासून संसाराचा गाडा माञ कोरमडला. या घरामध्ये गॕस,स्टील भांडी, ,पाण्याच्या टाकी ,जिवनावश्यक अन्न धान्य ,शेतीचे अवजारे ,पंप,कपडे व इतर संसारोपयोगी वस्तू दबल्याने मोठे प्रमाणात नूकसान झाले असून पडलेल्या घराचा पंचनामा होऊन उचित भरपाई मिळण्याची मागणी मुलगा जिभाऊ तुकाराम बाविस्कर,रमेश तुकाराम बाविस्कर यांनी केली आहे.गेल्या आठ दिवासापासून नांद्रा परिसरात अतिवृष्टी होत असून आता सर्व पक्षिय ओला दृष्काळ जाहिर करण्याची मागणी करत आहेत.शेतीचे येणारे उत्पन्न ही आता पुर्णताह नेस्तनाबूत झाले आहे कापूस पिवळा पडून पूर्ण सडला आहे,सोयाबीनच्या शेंगाना झाडावरच कोंब फुटू लागले आहेत,मक्का,ज्वारी व इतर पिके ही आडवे होऊन भुईसपाट झाली आहेत.शासनाच्या निकषाप्रमाणे ६०एमएम च्या वर पावसाची नोंद झाली तर अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते तरी आता सुमारे १००एम.एम च्या वर दररोज पर्जन्यमान होत आसून सरसकट ओला दृष्काळ जाहिर करावा अशी मागणी नांद्रा सह परिसरातील, गटातील हवालदिल झालेले शेतकरी वर्गातून व ग्रामस्थ यांच्यातून होत आहे.