जालन्यातील धनगर समाज एसटी आरक्षण उपोषणास राज्यातील आमदार खासदार यांचा जाहीर पाठिंबा
( जालना नगरीतून सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी(अनुसूचित जमात) आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून जालना येथे दिनांक १७ सप्टेंबर पासून उपोषणास बसलेले दिपक बोर्हाडे यांच्या उपोषणास राज्यातील अनेक आमदार खासदार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके साहेब,बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे,भाजपचे माजी खासदार विकास महात्मे यांनी थेट विदेशातून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.पैठणचे आमदार विलास भुमरे,सांगोल्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख,गेवराईचे आमदार विजयराव पंडीत, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर,बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके,पाथरीचे आमदार राजेश विटेकर,जालना जिल्ह्यातील सकल मराठा समाज,वकील महासंघ,ऑल इंडिया धनगर महासंघ नवी दिल्ली,मुलुख मैदानी तोफ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब,अहिल्या नगर यशवंत सेनेचे राहुरीतील विजय तमनर,पाथर्डीचे माजी सरपंच गणेश चितळकर,रुपनर सर,शेवगाव चे विनायक नजन सर,आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातील अनेक कार्यकर्ते यांनी या धनगर समाज एसटी आरक्षणास जाहीर पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही धनगर समाज एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही म्हणून धनगर समाज एसटी आरक्षणाचा लढा जालना येथे सुरू झाला असून त्याचा राज्य व्यापी महामोर्चा थेट जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर २४ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे.उपोषण कर्ते दिपक बोर्हाडे म्हणाले की मी जिवंत असेपर्यंत सरकारने एसटी आरक्षणाचा जी आर काढून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा या उपोषणात माझे काही बरेवाईट झाले तर महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही असे सरकारला ठणकावून सांगितले आहे.ज्यांनी धनगर समाजाचे कट कारस्थान करून एसटी आरक्षण अडविले आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी धनगर समाजातील कार्यकर्त्यांना केले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते जालना जिल्ह्यात चक्काजाम करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.