श्री गो से हायस्कूल येथे एसएससी परीक्षा मार्च 2022 साठी शिक्षकांची सहविचार सभा संपन्न
*मंगळवार दिनांक 15 मार्चपासून सुरू होत असलेल्या एसएससी परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असून शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक श्री सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व शिक्षकांची सहविचार सभा संपन्न झाली. परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना महाशय
मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना कोरोना बाबतचे प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळण्याचे आवाहन केले तसेच सोशल डिस्टंसिंग सोबतच शिक्षक व विद्यार्थी यांनी मास्क परिधान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सर्दी ताप खोकला किंवा कोरोना सदृश्य कुठलीही लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केल्याची माहिती या सभेत देण्यात आली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सॅनिटायझर तसेच हात धुण्यासाठी स्वतंत्र साबण व पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे या सभेत सांगण्यात आले. गो से हायस्कूल चा केंद्र क्रमांक 3500(1) असून या केंद्रावर एकूण 433 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मुख्य इमारतीत एकूण 18 ब्लॉक मध्ये करण्यात आलेली आहे. उपकेंद्र संचालक म्हणून सौ प्रमिला वाघ कामकाज पाहत आहेत तर आर एल पाटील एन आर ठाकरे व ए बी अहिरे परीक्षा समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहेत. परीक्षेदरम्यान निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींविषयी देखील या सभेत चर्चा करण्यात आली.*