चोपडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्या परिषद सदस्यपदी नियुक्ती

चोपडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्या परिषद सदस्यपदी नियुक्ती

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांची राज्यपाल महोदयांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य एन.एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी एस.हळपे व पर्यवेक्षक एस. पी पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले. विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्यापीठ परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.