गॅस, पेट्रोल,डिझेल,खाण्याचे तेल दरवाढी व महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जळगाव व महानगर महिला आघाडीतर्फे निषेध आंदोलन

गॅस, पेट्रोल,डिझेल,खाण्याचे तेल दरवाढी व महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जळगाव व महानगर महिला आघाडीतर्फे निषेध आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॕड.रविंद्रभैय्या पाटील व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.वंदनाताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे दैनंदिन प्रश्न- गॅस, पेट्रोल, डिझेल,खाण्याचे तेलाची अवास्तव दरवाढी विरोधात निषेध आंदोलन

जळगाव प्रतिनिधी :

आदरणीय प्रदेशाध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाई विरोधात निषेध आंदोलन जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले.

यावेळी शास्त्री टॉवर चौक पासुन ते राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत *गॅस दरवाढीसह पेट्रोल डिझेल,खाण्याचे तेल दरवाढी विरोधात केंन्द्र सरकारचा निषेध म्हणून निषेध रॅली काढण्यात आली.*

या अनोखे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी सिलेंडर ला फुलंहार घालून आणि चुलं ,गोवऱ्या ह्या हातगाडीवर ठेवून पंतप्रधान मोदींच्या आवाजाची ऑडिओ क्लिप-

गॅस के दाम कम हुये की नही हुये ,पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये ….. अशी क्लिप लावुन आठवण आणि सर्वसामान्य जनतेमध्ये या केंद्र सरकारविरोधात जनजागृती केली

आणि यावेळी बोलतांना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी यांनी सांगितले की, हे केंद्र सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सपशेल अपयशी ठरले असल्याने आज *गॅस व पेट्रोल डिझेल,खाण्याचे तेला चे भाव आस्मानी पोहचलेले आहे.सर्वसामान्य नागरीकांची दैनंदिन पोटं भरणारी भाकरी आता गॅस च्या अवास्तव दरवाढीमुळे चटके देत आहेत.आता करावे तरी काय ? ह्या महागाई’च्या काळात – घर चालविणारे सर्वसामान्य महिलांसमोर मोठे संकट व अडचणी निर्माण झाल्या आहेत.हि वाढती महागाई जनतेसाठी जीवघेणी ठरत असुन तातडीने गॅस, पेट्रोल डिझेल,खाण्याचे तेलाचे चे दरवाढ मागे घ्यावी आणि पुर्वीसारखे भाव सुरळीत ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि मोठमोठ्याने भाषणातुन सांगणारे मोदी साहेबांनी फक्त विमानात न बसता रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्नांकडे लक्ष घालावे यासाठी हि निषेध रॅली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.भैय्यासाहेब रविंद्र पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई चौधरी ,जिल्हा महानगर अध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील, वाल्मीक मामा पाटील, राजेश भाऊ पाटील, अशोकभाऊ पाटील,विलास पाटील, अनिरुध्द जाधव, रिजवान खाटीक, मजहर पठाण, रहीम तडवी, सुशील शिंदे, विशाल देशमुख, मिनाक्षी ताई चव्हाण, दिपीका ताई भामरे, संगिता भामरे, सायायबिन पटेल, सुनीता सूर्यवंशी, आशाताई येवले, व *इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते