कोकण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जीवनावश्यक वस्तु़ंचा ट्रक चिपळुण’साठी रवाना !!

कोकण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जीवनावश्यक वस्तु़ंचा ट्रक चिपळुण’साठी रवाना !!

एक हात मदतीचा – माणुसकी’साठी

माजी पालकमंत्री मा.गुलाबरावजी देवकर, जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी : कोकण येथे आलेल्या आस्मानी संकटामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झालेले असतांना अशा पुरग्रस्त परीस्थितीत बेघर झालेल्या नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंची गरज भासत असल्याने कुठेतरी एक हात मदतीचा माणुसकी’ म्हणुन जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जीवनावश्यक वस्तुंचा ट्रक चिपळुण कडे रवाना करण्यात आले आहे.

यासाठी माजी पालकमंत्री मा.गुलाबरावजी देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गफ्फारभाई,युवती जिल्हा अध्यक्ष सौ.कल्पिता पाटील ,अशोकभाऊ लाडवंजारी,वाल्मिक मामा, कल्पना पाटील,उज्वला शिंदे, अर्चना पाटील,संजय गरूड,यासह जिल्हा भरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.