श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण समारंभ संपन्न

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण समारंभ संपन्न

राष्ट्रीय सप्ताह साजरा
तनिष्का गटातर्फे विद्यार्थिनी व शिक्षिका भगिनी यांचा गौरव बक्षीस वितरण समारंभ संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा जागतिक महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, 100 मीटरधावणे,संगीत खुर्ची, स्मरणशक्ती स्पर्धा इ. मुलींसाठी व शिक्षिका भगिनींसाठी स्पर्धा उत्साहात पार पडल्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. शिक्षक भगिनींनी गायन मध्ये अंजली गोहिल , ज्योती पाटील , शितल साळुंखे, संगीता लासूरकर यांनी इशस्तवन सुरुवात केली यावेळी संगीता साठी रुपेश पाटील ,संगीत शिक्षक सागर थोरात. यांनी साथ दिली. गायन वादन. निबंध स्पर्धा इत्यादींमध्ये सहभाग नोंदवला बक्षीस समारंभ कार्यक्रमाला सुरुवातीला मा जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता सरस्वती यांचे पूजन तनिष्का गटातर्फे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योती वाघ, संचालिका जिजा ताई पाटील, सुधा जोशी, सुनीता मांडोळे, वैशाली जडे, ललिता पाटील, महिला अध्यक्ष रेखा देवरे, संध्या बोरसे, सरला पाटील महिला पदाधिकारी पाटील, यांच्या शुभहस्ते पी टी सी चे मातृतुल्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन श्रद्धा पवार ज्योती पाटील , तर प्रास्ताविक वैशाली कुमावत. . यांनी केले मनोगतात तनिष्का गटाच्या सुनिता मांडोळे यांनी महिलांनी सक्षम बनवणे स्वतःच्या पायावर उभे राहावे विद्यार्थिनींनी आत्मविश्वास निर्माण करावा चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवा अशा मार्गदर्शन सूचना विद्यार्थिनींना केल्या. सरला पाटील यांनी मनोगतात झाशीची राणी बद्दल गाणे म्हणून मनोगत व्यक्त केले, सुधा जोशी यांनी मनोगतात समानता, भेदभाव विसरून जिद्दीने काम करा, डोळ्यासमोर आदर्श ठेवा, असे मनोगत व्यक्त केले बक्षीस वितरण प्रसंगी एकूण 50 बक्षीस व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. विद्यार्थिनींचा उत्साह पाहून प्रमुख मान्यवर भारावले होते. तसेच महिला भगिनी यांनी घेतलेल्या स्पर्धेत त्यांना ही बक्षीस देण्यात आले त्यात प्रथम लिंबू चमचा स्पर्धेत चंदा चौधरी प्रथम, द्वितीय संगीता लासूरकर तृतीय वैशाली कुमावत, संगीत खुर्ची ज्योती पाटील प्रथम, द्वितीय शितल साळुंखे, तृतीय गायत्री पाटील, निबंध स्पर्धा वैशाली कुमावत, चंदा चौधरी विभागून द्वितीय संगीताला लासूरकर, तृतीय वनिता जगताप, गीत गायन संगीता लातूरकर, द्वितीय विभागून ज्योती पाटील, अंजली गोहिल, तृतीय श्रद्धा पवार इत्यादी महिला भगिनींना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. शाळेतील शिक्षिका शीतल महाजन यांच्या कन्या वैष्णवी महाजन यांना नुकताच पीएचडी पदवी मिळाल्याने त्यांचा सत्कार आई म्हणून करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षा ज्योती वाघ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने पुढे जाऊन यश संपादन करावे, कोरोना नंतर विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यासाला लागावे झालेले नुकसान भरून काढावे असे आवाहन केले. आभार प्रदर्शन गायत्री पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष प्रेरणा व मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ,पर्यवेक्षक एन आर पाटील सर्व शिक्षक शिक्षक भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले