पाचोरा मराठा महासंघ “त्या” ध्येयवेड्या च्या भेटीला

पाचोरा मराठा महासंघ “त्या” ध्येयवेड्या च्या भेटीला

महाराष्ट्रातील मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाचा छावा पुणे येथील बापूराव गुंड पुणे ते दिल्ली उलट पाई प्रवासाला निघाला आहे पाचोरा मराठा महासंघ पदाधिकाऱ्यांनी त्या ध्येयवेड्या ची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

पाचोरा- महाराष्ट्रातील मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण मिळावे या व इतर मागण्यांसाठी पुणे ते दिल्ली उलट पायी चालत जाण्याचा संकल्प घेऊन जनजागृती करणाऱ्या बापूराव गुंड यांची पाचोरा तालुका मराठा महासंघाने धुळे येथे भेट घेऊन चर्चा केली. समाजासाठी रस्त्यावर येऊन देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या बापूराव गुंड यांनी पुणे ते दिल्ली उलट पायी प्रवास करून पंतप्रधानांसह अन्य प्रमुख नेत्यांना निवेदन देण्यासाठी आपले आंदोलन सुरू केले आहे.

श्रीपतराव दगडोपंत गुंड उर्फ बापूराव गुंड यांनी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी फुरसुंगी- पुणे येथून त्यांनी उलट पायी चालत दिल्लीकडे प्रस्थान केले आहे.

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे, देशात मतदानाची सक्ती करावी, मराठा आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, महिलांवरील वाढते अन्याय-अत्याचार कठोर कायद्यान्वये त्वरित थांबवावेत, सर्व समाजातील मुलींना मोफत शिक्षण मिळावे, शेतीव्यवसायाला अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासह अनेक मागण्या चे निवेदन ते दिल्ली येथे पंतप्रधानांना देणार आहेत.

दिनांक 9 मार्च रोजी ते धुळे येथे पोहोचले. सायंकाळी ७ वाजता मराठा महासंघ पाचोरा च्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती , सहकार नेते सतीशबापू शिंदे यांचे समवेत बापूराव गुंड यांची धुळे येथे भेट घेऊन आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. बापूराव गुंड व बापूसाहेब सतीश शिंदे यांच्या जुन्या मैत्रीच्या खूप गप्पा यावेळी झाल्या. या ध्येयवेड्या च्या भेटी प्रसंगी पाचोरा तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी भास्करराव शिंदे, उपाध्यक्ष प्रा. एस.डी. थोरात, श्री सुनील देशमुख, सरचिटणीस राहुल आप्पा बोरसे, चिटणीस चंद्रकांत बाजीराव पाटील, वैभव लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

धुळे येथील नगाव बारी या ठिकाणी राष्ट्रीय राजमार्ग वरील व्यंकटेश प्रसाद हॉटेल चे संचालक व धुळे पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील, शिवसेना धुळे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. अतुलभाऊ सोनवणे, जेष्ठ पत्रकार श्री. निंबा नाना मराठे,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.