पाचोर्‍यातील माळी समाज महासंघाचे मा.जिल्हाध्यक्ष विठ्ठल महाजन यांचा भाजपात प्रवेश

पाचोर्‍यातील माळी समाज महासंघाचे मा.जिल्हाध्यक्ष विठ्ठल महाजन यांचा भाजपात प्रवेश

——————————————————-
पाचोरा-
येथील माळी समाज महासंघाचे मा. जिल्हाध्यक्ष विठ्ठल एकनाथ महाजन यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर-पाटील, लोकसभा निवडणूक समन्वयक राधेश्याम चौधरी,भाजपा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ, व पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केला असून त्यांनी याआधी माळी समाज महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पदासह,माजी अध्यक्ष- क्षत्रीय माळी समाज पंचमंडळ कृष्णापुरी पाचोरा, माजी जिल्हा संघटक- अ.भा.महात्मा फुले समता परिषद जळगाव,माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जळगाव,माजी जिल्हा सरचिटणीस शाहीर परिषद जळगाव अशा विविध सामाजिक पदांवर काम केले असून माळी समाजाचा पाचोरा व भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख नेतृत्व करणारा चेहरा हा भारतीय जनता पार्टीत आल्याने नक्कीच संपूर्ण जळगाव जिल्ह्याला भविष्यात त्यांचे सामाजिक संघटन कौशल्यचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असे मानले जात आहे.
यावेळी पाचोरा भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रवेशानंतर त्यांचे सत्कार करून अभिनंदन केले व वरील सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पाचोरा शहर व ग्रामीण मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.