जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बाल कल्याण समितीच्या ‘चाईल्ड फ्रेंडली’ कार्यालयाचे उदघाटन

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बाल कल्याण समितीच्या ‘चाईल्ड फ्रेंडली’ कार्यालयाचे उदघाटन

जळगाव,दि.21 :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व इंटरनेशनल जस्टीस मिशन, मुंबई (IJM) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कल्याण समितीच्या, कार्यालयाचे ‘चाईल्ड फ्रेंडली’ नुतनीकरण करण्यात आले. नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सोमवारी झाले.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष व सदस्य बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांचे पुष्प,रोप देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात आले. तसेच मावळते अध्यक्ष व सदस्य, बाल कल्याण समिती यांचे प्रमाणपत्र व पुष्प देऊन चांगल्या कामगिरी बाबत आभार व्यक्त करण्यात आले. तसेच 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील प्रवेशित बालकांना अभिनंदन प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, श्रीमती डॉ.वनिता सोनगत यांनी केली.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की महिला व बाल विकास व (IJM) यांच्या मार्फत Child Welfare Committee Child Friendly हा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच बाल कल्याण समितीने कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद आहे. 10 वी व 12 वीत उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील प्रवेशित बालकांचे कौतुक करुन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आभार (IJM) चे समन्वयक, विशाल घुले यांनी व्यक्त केले.